मुंबई । राज्य विधिमंडळाच्या दोन दिवसीय हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. आजही विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात खडाजंगी पाहायला मिळली. मात्र, आतापर्यंतच्या सभागृहातील कामकाजात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्यातील जुगलबंदी चर्चेचा विषय ठरत आहे. ‘माझ्या भाषणात जो अडथळा आणतो, तो पुन्हा कधी जिंकू शकत नाही, अशी आरोळी सुधीर मुनगंटीवार यांनी विधीमंडळातच ठोकली. त्यानंतर मुनगंटीवारांचं चॅलेंज थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वीकारलं. तुमचं आव्हान मी स्वीकारतो, मला पाडून दाखवा, असं खुलं आव्हानचं अजितदादांनी दिलं
सभागृहात नेमकं काय झालं?
भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी पुरवणी मागण्या, हक्कभंग प्रस्ताव अशा विविध मुद्द्यावरुन ठाकरे सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. विमानतळापेक्षा एसटी महत्त्वाची आहे, मुख्यमंत्री कार्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पैसे दिले, पण आमदारांच्या वाहनचालकांना दिले नाहीत. दिव्यांगांचे पैसे दिले नाहीत, असे दावे मुनगंटीवार करत होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला. त्यावर “माझ्या भाषणात जो अडथळा आणतो तो पुन्हा कधी जिंकू शकत नाही” असा फटकारा मुनगंटीवारांनी मारला. त्यावर अजित पवारांनीही तुमचं आव्हान मी स्वीकारतो, मला पाडून दाखवा, असं म्हणत सुधीर मुनगंटीवार यांना निरुत्तर केलं. (Two Days winter session of maharashtra legislature)
“… पर हमारा रिश्ता तूट गया”
“अजितदादा.. हे तुमच्यासाठी, माझ्यासाठी, मुख्यमंत्र्यांसाठी आणि देवेंद्रजींसाठी लागू होतं… आपको आप के परिवारकी बहुत परवा होती है.. माझं कुटुंब माझा परिवार, हे त्यातून आलं. फक्त एक वाक्य इथे लागू होत नाही. मी त्या रसेल फॉस्टरचा पत्ता घेऊन पाठवणार आहे. आप अपने रिश्ते को बचाने के लिये किसी भी हद तक जा सकते हो… पर हमारा रिश्ता तूट गया.. इथे काहीतरी चुकलं” असा टोमणा मुनगंटीवारांनी मारला. “कठीण परिश्रम के लिये इनके मन में बहुत सन्मान होता है… आणि हे दादांना पाहिलं की मला पटतं. कारण अजितदादा सकाळी ६-७ वाजता उठून कामाला लागतात. उद्धवसाहेब कठीण परिश्रम घेतात, देवेंद्रजी तर घेतातच. थोडी माझ्यातच कमतरता आहे.” अशी मिश्किल टिपणीही त्यांनी केली.
केंद्रानं संसदेचं अधिवेशन रद्द केल्याने, राज्यातील भाजप नेत्यांवर तोंडावर आपटण्याची वेळ; 'हे' आहे कारण
वाचा सविस्तर-👉🏽 https://t.co/PApK2FNRYC@Dev_Fadnavis @BJP4Maharashtra @BhatkhalkarA #HelloMaharashtra— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) December 15, 2020
आंदोलन दिल्लीत, पंतप्रधान मोदी घेणार गुजरातमधील कच्छच्या शेतकऱ्यांची भेट
वाचा सविस्तर-👉🏽 https://t.co/ZZrNVbLwsI@narendramodi @PMOIndia #farmersrprotest #FarmerProtestHijacked #FarmBills2020 #HelloMaharashtra— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) December 15, 2020
विधिमंडळात राडा! आमदारांनी सभापतींना धरून खुर्चीतून खेचलं खाली
वाचा सविस्तर-👉🏽 https://t.co/cY6ovyZYZr#HelloMaharashtra @INCMaharashtra @BJP4Maharashtra #HelloMaharashtra— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) December 15, 2020
Big News
ग्रामपंचायत रणधुमाळी: सरपंचपदाची आरक्षण सोडत निवडणुकीनंतरचं, जुनं आरक्षण रद्द!
वाचा सविस्तर-👉🏽 https://t.co/zACLaZqCIj#HelloMaharashtra #Reservation #politicalnews— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) December 15, 2020
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’