हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या महाविकास आघाडी सरकारमधील महत्वपूर्ण असलेला पक्ष शिवसेना यातील बढया नेत्यांवर ईडीकडून कारवाई केली जात आहे. या कारवाईवरून भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेला आज टोला लगावला. ईडीच्या वतीने जी कारवाई केली जात आहे त्या कारवायांमागे भाजपकडून कोणतेही राजकारण केले जात नाही आणि तीन नेते म्हणजे शिवसेना नाही,” असा टोला मुनगंटीवारांनी लगावला आहे.
शिवसेना नेत्यांवर ईडीकडून कारवाई केली जात असल्याने त्याबाबत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “शिवसेनेच्या मंत्र्यांवर, नेत्यांवर ईडीची होणारी कारवाई हा यंत्रणेच्या तपासाचा भाग आहे. यामध्ये कोणत्याही स्वरूपाचे राजकारण नाही. यापूर्वीही अनेक नेत्यांवर ईडीच्या कारवाया करण्यात आलेल्या आहेत.
ईडीच्यावतीने केल्या जात असलेल्या कारवाईबाबत सांगायचे झाले तर शिवसेनेचे पाच बडे नेते ईडीच्या रडारवर आहे. परिवहन मंत्री अनिल परब हे 100 कोटी वसुलीप्रकरणात, माजी खासदार आनंदराव अडसूळ 900 कोटींच्या अफरातफरीप्रकरणी तर खासदार भावना गवळी या सुद्धा ईडीच्या रडारवर असल्याचे यावेळी मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.