नवी दिल्ली । भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि त्यांची आई माधवीराजे सिंधिया यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यांना दिल्लीच्या मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सिंधिया यांना खोकला आणि ताप ही लक्षणं दिसत होती. त्यानंतर त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली.
लॉकडाऊनपासूनच ज्योतिरादित्य सिंधिया हे दिल्लीत आहेत. ते त्यांच्या कुटुंबियांसोबत दिल्लीत आहेत. पण ४ दिवसांपूर्वी अचानक ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यात कोरोनाचे लक्षण आढळल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यात कोरोनाची लक्षणं दिसत होती. पण त्यांच्या आई माधवीराजे सिंधिया यांच्यात कोणतीच लक्षणं दिसत नव्हती. पण दोघांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे.
काही दिवसांपूर्वीच ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिट्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. सिंधिया भाजपच्या गोटात सामील झाल्यानंतर मध्यप्रदेशमधील काँग्रेस सरकार पडलं. दरम्यान, भाजपने ज्योतिरादित्य सिंधिया यांना मध्य प्रदेशमधून राज्यसभेची उमेदवारी दिली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”