भाजप नेत्याकडून रेमडिसिवीरचा साठा करणे मानवतेच्या विरुद्ध , प्रियंका गांधी यांची फडणवीसांवर टीका

Priyanka Gandhi
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : रेमडिसिवीरच्या मुद्द्यावरून कॉंग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. एक व्हिडिओ शेअर करत रेमडिसिवीरचा साठा करणे हे मानवतेच्या विरोधात आहे. अशी टीका प्रियंका गांधी यांनी केली आहे.

त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की,’ जेव्हा देशाच्या कानाकोपऱ्यातून रेमडिसिवीरची मागणी होत आहे. प्राण वाचवण्यासाठी रेमडिसिवीर मिळावे म्हणून लोक वणवण भटकत आहेत. त्याच वेळी एका महत्त्वाच्या पदावर राहिलेल्या भाजपनेत्याने रेमडिसिवीरचा साठा करणं हे मानवतेच्या विरोधात आहे. अशी टीका प्रियंका गांधी यांनी ट्वीट करीत केली आहे.

दरम्यान भाजपने ही प्रियंका गांधी यांना प्रत्युत्तर दिले आहे. प्रियंका गांधी यांनी थोडा अभ्यास करून बोललं पाहिजे. राज्यात काँग्रेस सत्तेत आहेत. महाराष्ट्रात ऑक्सिजन आणि बेडही मिळत नाहीत. महाराष्ट्र सरकार कोरोना रोखण्यासाठी अपयशी ठरत आहे. प्रियंका गांधी यांनी किमान महाराष्ट्र सरकारकडून तरी याचा हिशेब मागितला पाहिजे. असे भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी म्हंटले आहे. नवाब मलिक जितेंद्र आव्हाड आणि आता प्रियंका गांधी फडणवीसांवर ट्विट करून टीका करत आहेत. हे लोक फडणवीसांना घाबरत आहेत का? असा सवाल भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी केला आहे. तर प्रियंका यांनी अज्ञानापोटी माहिती नसताना वरिष्ठ नेत्यांवर टीका केली आहे. त्यांचे वक्तव्य किव करण्यासारखे आहे. रेमडिसिवीर चा काळाबाजार झाला असेल तर पकडा आणि जेलमध्ये टाका असं आव्हान विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिले आहे.

काय आहे प्रकरण?

राज्यात काही दिवसांपूर्वी रेमडिसिवीर इंजेक्शनचा प्रचंड तुटवडा होता. राज्य सरकार त्यावेळी रेमडिसिवीर इंजेक्शन मिळवण्यासाठी धडपडत होते. अशातच 12 एप्रिलला भाजपनेते प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर हे थेट दमणच्या ग्रुप फार्मा कंपनीच्या कार्यालयात पोहोचले होते. त्यावेळी कंपनीकडून भाजपच्या नेत्यांना 50,000 इंजेक्शन देण्यात आल्या होत्या ही सर्व इंजेक्शन आम्ही महाराष्ट्राला देणार असल्याचे भाजपने त्यांनी सांगितलं होते