भाजप आमदार गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर हल्ला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडी सरकारवर अनेक कारणांवरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून टीका केली जाते. शिवसेनेवरही पडळकर यांनी टीका केली होती. दरम्यान आटपाडी येथे आमदार गोपीचंद पडळकर गट व शिवसेना गट या दोन्ही गटात वादावादी झाली. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या ताफ्यातील काही गाड्या फोडन्याय आल्या. यावेळी पडळकरांच्या गाडीवरही हल्ला करण्यात आला.

याबाबात अधिक माहिती अशी की, सध्या आटपाडीत जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांतील इच्छुक उमेदवारांकडून प्रचार केला जात आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे या ठिकाणी आले होते. यावेळी गोपीचंद पडळकर गट आणि शिवसेना- राष्ट्रवादीचा गटातील कार्यकर्ते आमनेसामने आले. यावेळी झालेल्या वादावादीत मोठ्या प्रमाणात गाड्या फोडण्यात आल्या. यामध्ये काहीजण जखमीही झाले.

या ठिकाणी झालेल्या वादावादीचे कारण हे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत सोसायटी गटातील उमेदवार पळवा- पळवीवरुन वाद झाल्याचे सांगितले जात आहे. आटपाडी मधील साठे चौकात हा वादावादीचा प्रकार घडला असून आटपाडी मध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Comment