हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली असून विरोधकांनी सरकारला वीजबिला वरून घेरण्याचा प्रयत्न केला. थकीत वीजबिले, कट केलेली लाईट कनेक्शन,या विविध मुद्द्यावरून भाजप आमदार जयकुमार गोरे यांनी सरकारला आरसा दाखवत डीपी कट न करता थकीत शेतकऱ्यांचे हवं तर वीज कनेक्शन कट करा असं म्हंटल. यावेळी त्यांनी एक उदाहरण सरकारला दिले
जयकुमार गोरे म्हणाले, समजा, एका डीपीवर २० वीज कनेक्शन असतील आणि त्यातील १० शेतकऱ्यांनी लाईट बिल भरलं आणि १० जणांनी नाही भरलं तर सरकारकडून डीपी कट केला जात आहे त्यामुळे असं केल्यास ज्या शेतकऱ्यांनी लाईट बिल भरलं त्यांचं नुकसान होत, त्यामुळे डीपी कट न करता कनेक्शन कट करावं असे जयकुमार गोरे यांनी म्हंटल
जयकुमार गोरे यांच्या प्रश्नानंतर ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी उत्तर दिले, शेतकऱ्यांना वीज पुरवठा करत असताना एका खांबा वरून अनेक कनेक्शन देण्यात येतात, काही लोक बिल भारतात आणि काही भरत नाहीत त्यांची दखल आम्ही घेतली आहे आणि जे लोक वीज बिल भारतात त्यांना आम्ही संरक्षण देणार आहे अशी माहिती नितीन राऊत यांनी दिली,