‘पंकजा मुंडे माझ्यावर नाराज नाहीत’ – आमदार मोनिका राजळे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अहमदनगर प्रतिनिधी । शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघात ‘भाजपा’ने विद्यमान आमदार मोनिका राजळे यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. पंकजा मुंडे यांना मानणारा बराच मोठा वर्ग या मतदारसंघात आहेत. त्यातच गेल्या काही दिवसापासून आमदार राजळे यांच्यावर पंकजा नाराज असल्याची चर्चा चालू होती. मात्र, आज प्रचाराच्या शुभारंभावेळी पंकजा आपल्यावर नाराज नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आमदार राजळे यांना भाजपमधील एका गटाचा विरोध होता. या नाराज गटाने आमदार राजळे यांना सोडून कोणालाही उमेदवारी द्या अशी मागणी करत काही दिवसांपूर्वी मेळावा घेतला होता. तसेच या मतदारसंघात वंजारी समाजाचे मोठे प्राबल्य असून पंकजा मुंडे म्हणतील तीच पूर्व दिशा असा मानणारा मोठा मतदार वर्ग आहे. महाजनादेश यात्रा यांसह काही कार्यक्रमांना पंकजा मुंडे यांची अनुपस्थिती होती. हाच धागा पकडून मुंडे या मोनिका राजळे यांच्यावर नाराज असून प्रचाराला येणार नसल्याचा प्रचार सोशल मीडियाच्या माध्यमातून होत होता. यावरच आज प्रचार शुभारंभ कार्यक्रमात राजळे यांनी याबाबत खुलासा केला.

”पंकजा मुंडे या नाराज नसून आम्ही सातत्याने संपर्कात आहोत. त्यांच्या प्रचार सभा होणार आहेत” असे त्यांनी स्पष्ट केले. विरोधक जाणीवपूर्वक अपप्रचार करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसने ऐनवेळी वंजारी समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रताप ढाकणे यांना ऐनवेळी मैदानात उतरवले आहे. त्यामुळे प्रचाराच्या निमित्ताने जातीय समीकरण यांची चर्चा मतदारसंघात होत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार राजळे यांनी पंकजा मुंडे नाराज नसल्याचे सांगताना त्यांच्या सभा होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

इतर काही बातम्या-

 

 

 

Leave a Comment