अर्णब गोस्वामींच्या समर्थनार्थ राम कदमांचे उपोषण ; पोलिसांनी घेतलं ताब्यात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामींना अटक केल्याच्या निषेधार्थ भाजपा आमदार राम कदम यांनी लाक्षणिक उपोषण केले आहे. शुक्रवारी सकाळी आमदार राम कदम हे मंत्रालयाच्या गेटसमोर फुटपाथवर आंदोलनाला बसले, यावेळी त्यांनी डोक्याला काळी पट्टी बांधून अर्णब गोस्वामींच्या अटकेचा निषेध करत महाराष्ट्र सरकारवर दडपशाहीचा आरोप केला. त्यानंतर काही वेळांनी पोलिसांनी आमदार राम कदम यांना ताब्यात घेतले.

लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणजे पत्रकारितेवरील हल्ला आहे. पत्रकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी केली जात आहे. अर्णव गोस्वामी यांची तातडीने सुटका करा आणि सूडबुद्धीने केलेले त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबावरील आरोप मागे घ्या, अर्णव यांच्याबरोबर गैरवर्तन करणाऱ्या 9 पोलिसांना निलंबित करा, या मागणीवरुन आमदार राम कदम यांनी काळी फित बांधून महाराष्ट्र सरकारचा पुतळा जाळला. महाराष्ट्रातल्या अप्रत्यक्ष आणीबाणीविरोधात उपोषण करणार असल्याची घोषणाही भाजपाच्या राम कदम यांनी केली आहे. भाजप आमदार राम कदम यांना मरीन लाईन्स पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, मंत्रालयाच्या समोर उपोषणाला बसलेल्या राम कदम यांना ताब्यात घेतले आहे. अर्णव गोस्वामी यांना सोडावं या मागणीसाठी राम कदम यांनी मंत्रालयासमोर उपोषण सुरू केलेलं होतं. पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा आपलं लाक्षणिक उपोषण सुरूच राहील, असं त्यांनी म्हटलेले आहे

दरम्यान, हे लाक्षणिक उपोषण अर्णब गोस्वामींवर प्रेम करणाऱ्या कोट्यवधी लोकांचे प्रतिनिधित्व म्हणून करत आहोत, महाविकास आघाडी सरकारची जुलमी हिटलरशाही चालणार नाही, त्यांना अर्णब गोस्वामींसह सर्व पत्रकारांची माफी मागावी लागेल. मी विधानसभेचा सदस्य आहे, जर रस्त्यावर मी आंदोलन करत असेल तर सरकारने मला बोलावून माझं म्हणणं ऐकलं पाहिजे, नाहीतर हे सरकार कोणत्या कातडीचे आहे कळेल असा टोलाही राम कदम यांनी ठाकरे सरकारला लगावला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment