वरूण सरदेसाई राज्य सरकारचे जावई असतील तर त्याचं परिपत्रक जाहीर करा – राम सातपुते

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईतील नारायण राणेंच्या जुहू येथील निवासस्थान परिसरात शिवसेनेकडून आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेना युवा सेनेचे अध्यक्ष वरुण सरदेसाई यांनीही अपशब्द वापरले. त्याबाबत आता भाजपचे माळशिरसचे आमदार राम सातपुते यांनी वरुण सरदेसाई यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विट करीत “महाराष्ट्र पोलिसांना आई बहिणीवर शिव्या देणारे वरूण सरदेसाई राज्य सरकारचे जावई असतील तर त्यांच परिपत्रक तरी जाहीर करणार आहात का ..? असा सवालही उपस्थित केला आहे.

मंत्री राणेंनी मुख्यमंत्री ठाकरेंविरोधात आक्षेपार्ह वक्तव्ये केल्यामुळे मुंबईत शिवसेना युवा सेनेचे अध्यक्ष वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली भाजपनेते तथा मंत्री राणेंच्या घराबाहेर मोठ्या संख्येने युवासैनिकांनी एकत्रित येत आंदोलनास सुरुवात केली. यावेळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान वरूण सरदेसाई यांनी राणेंबद्दल व पोलिसांबद्दल अनेक आक्षेपार्ह विधाने केली. त्यानंतर सरदेसाई यांच्यावर पोलिसांनी अटक करून कारवाईही केली. यावृ भाजपचे आमदार राम कदम यांनी ट्विट करीत निशाणा साधला आहे.

https://twitter.com/RamVSatpute/status/1430753471926579201?s=20

भाजपचे आमदार राम कदम यांनी ट्विट करीत राज्य सरकार व पोलिसांना सवाल केला आहे की, “महाराष्ट्र पोलिसांना आई बहिणीवर शिव्या देणाऱ्या वरूण सरदेसाई ला कोणत्या कोर्टात हजर केलं आहे ? वरूण सरदेसाई राज्य सरकारचे जावई असतील तर त्याच परिपत्रक तरी जाहीर करणार आहात का ..? असा सवाल सातपुते यांनी विचारला आहे. शिवसेना युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यानी मुंबईत येथील केलेल्या आंदोलना दरम्यान पोलिसांना शिवीगाळ केले होती. त्यावेळी त्यामध्ये शिवसेना युवा सेनेचे अध्यक्ष वरुण सरदेसाई यांचाही सहभाग होता.

Leave a Comment