हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अमरावती महापालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्यावरील शाइफेक प्रकरणी भाजप आमदार रवी राणा यांच्यावर गुन्हा दाखल झाला. याचे मोठे पडसाद विधानसभेत पाहायला मिळाले. रवी राणा दिसला तर त्याला गोळ्या घाला असे आदेश देण्यात आलेत असा गंभीर आरोप त्यांनी राज्य सरकारवर केला. यानंतर सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये गदारोळ माजला.
मी दिल्लीत असताना माझ्यावर अमरावती मध्ये गुन्हा दाखल केला. मी त्याबाबत माहिती घेतली असता पोलीस आयुक्त म्हणाले की, सरकार मधील काही प्रमुख लोकांनी गुन्हा दाखल करायला लावला. आणि रवी राणाला अटक करा असे आदेश देऊन १०० पोलीस माझ्या घरी गेले असे रवी राणा म्हणाले. तसेच यामागे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आहेत असा आरोप करत त्यांनी एक पेनड्राईव विधानसभेत सादर केला
माझ्यावर रात्री १० वाजता गुन्हा दाखल केला. आणि मला सांगण्यात येत कि आमच्यावर एवढा दबाव आहे कि रवी राणा कुठे दिसला तर त्याला गोळी मारा असा गंभीर आरोप त्यांनी केला. तसेच जर मी खोट बोलत असेल तर मला फाशी द्या असे रवी राणा यांनी म्हंटल. तुम्ही जर सूडबुद्धीने काम करणार असाल तर तुमचाही अनिल देशमुख होईल असा इशारा रवी राणा यांनी सरकारला दिला.