‘हे सरकार धनगर विरोधी!’; पडळकरांचे विधिमंडळाबाहेर धनगरी वेषात ढोल वाजवत आंदोलन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशानात धनगर समाजाच्या प्रश्नांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज खास धनगरी वेष परिधान करुन आणि ढोल वाजवत आंदोलन केलं. त्यावेळी पोलिसांकडून त्यांना रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण प्रवीण दरेकर, प्रसाद लाड आणि सदाभाऊ खोत यांनी पोलिसांना रोखत पडळकरांना आपलं आंदोलन करु दिलं. यावेळी गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. (Gopichand Padalkar’s agitation during the winter session)

https://twitter.com/GopichandP_MLC/status/1338388110334259200?s=20

महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर एकही बैठक घेतली गेली नाही. महाविकास आघाडी सरकारमधीलच काही नेते पिवळा फेटा, खांद्यावर घोंगडी, हातात काठी घेऊन धनगर आरक्षणावर प्रश्न विचारत होते. मग आता तेच नेते गप्प का? असा सवाल गोपीचंद पडळकर यांनी केलाय. देवेंद्र फडणवीस यांनी जे आदिवासींना तेच धनगरांना दिलं होतं. धनगरांसाठी 500 कोटी रुपयांची तरतूद केली होती. पण त्यातील एक रुपयाही महाविकास आघाडी सरकारनं दिला नाही. यशवंत महामेश योजनाही राज्य सरकारनं रद्द केली. हे सरकार धनगर, भटक्या विमुक्त समाजाच्या विरोधात असल्याचा गंभीर आरोपही पडळकरांनी केला आहे.

धनगरांच्या अस्तित्वाशी खेळ
झोपेचं सोंग घेणाऱ्या सरकारला जागं करण्यासाठी धनगरी पेहराव परिधान करुन, ढोल वाजवून सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न आपण करत असल्याचं पडळकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. हा पेहराव आणि ढोल म्हणजे आमचा स्वाभिमान, अभिमान आणि अस्तित्व आहे. पण या अस्तिस्वाशी खेळ करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी सरकार करत असल्याची टीका पडळकरांनी केलीय.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

 

Leave a Comment