हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही महिन्यांपासून भाजप आणि मनसेमध्ये जवळीक झालेली पाहायला मिळत आहे. त्यातच काल मनसेच्या दिपोस्तव सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली होती. यांनतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सूरज चव्हाण यांनी भाजप आणि मनसे वर निशाणा साधला आहे. भाजप- मनसेचं नातं लिव-इन रिलेशनशिप मधे राहणाऱ्या जोडप्यासारखं आहे टीका त्यांनी केली आहे.
सूरज चव्हाण यांनी ट्विट करत म्हंटल की, भाजप व मनसे यांचं नातं लग्नाच्या आधी लिव-इन रिलेशनशिप मधे राहणाऱ्या जोडप्यासारखं झालंय.दोघांचीही पार्टनर बदलायची सवय व पूर्वानुभव बघता हे नातं मुंबई महानगर पालिका निवडणुकी पर्यंत टिकेल अशा शब्दात त्यांनी दोन्ही पक्षांवर निशाणा साधला आहे.
भाजप व मनसे यांचं नातं लग्नाच्या आधी लिव-इन रिलेशनशिप मधे राहणाऱ्या जोडप्यासारखं झालंय.दोघांचीही पार्टनर बदलायची सवय व पूर्वानुभव बघता हे नातं मुंबई महानगर पालिका निवडणुकी पर्यंत टिकेल.
— Suraj Chavan (सूरज चव्हाण) (@surajvchavan) October 21, 2022
दरम्यान, राज्यातील महाविकास सरकार कोसळायच्या आधीचपासून भाजप आणि मनसे मध्ये जवळीक वाढली आहे. राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्याचा मुद्दा उपस्थित करताच भाजपने त्यांच्या भूमिकेचं समर्थन केलं होत. त्यातच आता मुंबई महापालिका निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. सध्या राज्यात शिंदे – फडणवीस सरकार असलं तरी उद्धव ठाकरेना शह देण्यासाठी मनसेची भूमिका गेमचेंजर ठरू शकते.