हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते आणि शिवसेनेचे कट्टर विरोधक असलेले नारायण राणे यांना अचानकपणे दिल्लीला बोलवण्यात आलं असून मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात नारायण राणे यांचं स्थान निश्चित मानलं जात आहे.
दिल्लीत जाऊन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतील. महाविकास आघाडी सरकार आणि विशेषत: शिवसेनेला सातत्यानं अंगावर घेण्याचं काम राणेंनी केलं आहे. त्याच कामाची पावती म्हणून त्यांना मंत्रिपद दिलं जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
दरम्यान खुद्द राणे यांना याबाबत विचारलं असता त्यांनी त्यावर हसून प्रतिक्रिया दिली. असं काही घडत असेल तर मी आभार मानतो. तुमच्या तोंडात साखर पडो. अधिकृत पत्रं येत नाही आणि जोपर्यंत शपथ घेत नाही, तोपर्यंत जरा धीर धरा, असं राणे यांनी हसत सांगितलं होतं.