Satara News : सातार्‍यात खा. उदयनराजेंनी केलं दीड कोटींच्या रेड्यासोबत फोटोसेशन तर कुठं गरबा दांडियात गाण्यावर धरला ठेका…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या हटके स्टाइलसाठी प्रसिद्ध असणारे सातारचे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांचे दोन व्हिडीओ सध्या सोशल मिडीयात प्रचंड व्हायरल होत आहेत. सातार्‍यातील जिल्हा परिषद मैदानावर छत्रपती कृषी, औद्योगिक प्रदर्शनामध्ये विलास गणपती नाईक यांचा दड कोटी रूपये किंमतीचा गजेंद्र रेडा प्रदर्शनात आकर्षण ठरलाय. दररोज 15 लिटर दूध, ४ किलो पेंड, ३ किलो गव्हाचा आटा आणि ३ किलो सफरचंद, असा दैनंदिन खुराक असलेल्या रेड्याला पाहताच खासदार उदयनराजे भोसले देखील चकित झाले. तसेच त्यांनी त्याठिकाणी फोटोसेशन केलं. त्यानंतर गुरुवारी रात्री सातार्‍यातील गरबा दांडियाला हजेरी लावत त्यांनी आपल्या स्टाईलने कॉलर उडवत दांडिया फिरवत गाण्यावर ठेका धरला.

साताऱ्यात नुकत्याच पार पडलेल्या या दोन वेगवेगळ्या कार्यक्रमांना दिलेल्या भेटीमुळे खासदार उदयनराजे भोसले हे सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत. तसे पाहिले तर तरूणांमध्ये त्यांची प्रचंड क्रेझ आहे. ते स्टेजवर आल्यानंतर चाहत्यांच्या टाळ्या आणि शिट्ट्या थांबतच नाहीत. गरबा दांडियात देखील उदयनराजेंची तीच झलक चाहत्यांना पाहायला मिळाली. मंचावर एन्ट्री करताच कॉलर उडवत उदयनराजेंनी गाण्यावर ठेका धरला.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/1533939750685150

तरूणाईच्या आग्रहाखातर त्यांनी दांडिया फिरवत गरब्यात धमाल उडवून दिली. “एक बार जो मैने कमेंटमेंट कर दी, तो मै अपनी खुद की भी नाही सुनता, मै झुकेगा नही साला,” या उदयनराजेंच्या डायलॉगवर सातार्‍यातील तरूणाई फिदा असते. त्यांच्या डायलॉगवरून अनेक गाणीही तयार करण्यात आली आहेत. ती गाणी सातार्‍यात डीजेवर ऐकायला मिळतात आणि त्यावर तरुणाई थिरकताना दिसून येते. दरम्यान, खासदार उदयनराजे भोसले यांनी काल गरबा दांडियाला भेट देत आपली हटके स्टाईलची झलक पुन्हा एकदा दाखवून दिली.