Gold Price Today : सोन्या चांदीच्या किंमतीचा पारा चढला; खरेदीदारांनो आजचे भाव तपासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Gold Price Today| सणासुदीच्या काळामध्ये सोन्याचे दागिने खरेदी करावे ही प्रत्येकाची इच्छा असते. मात्र सध्या सोन्याचे भाव वाढत चालल्यामुळे ग्राहकांना इच्छा असताना देखील सोने खरेदी करणे परवडत नाहीये. आज पुन्हा एकदा सराफ बाजारातील सोन्याच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे आज सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या खिशाला चांगली खात्री बसू शकते. तर चांदीच्या किंमतीत देखील वाढ झाल्यामुळे ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागू शकतात.

Good Returns नुसार, आज 22 कॅरेट 10 ग्रॅम (Gold Price Today) सोन्याची किंमत 56,400 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 61,530 रूपये असा सुरू आहे. MCX नुसार, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,400 रुपये अशी सुरू आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 61,530 रुपयांनी व्यवहार करत आहे.

Gold Price Today
Gold Price Today

(Gold Price Today) Good Return वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 56,400 रुपये
मुंबई – 56,400 रुपये
नागपूर – 56,400 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 61,530 रूपये
मुंबई – 61,530 रूपये
नागपूर – 61,530 रुपये

Gold Price Today
Gold Price Today

चांदीचे भाव

आज ग्राहकांना चांदीच्या किंमतींमध्ये (Gold Price Today) देखील दिलासा मिळालेला नाही. शुक्रवारी 10 ग्रॅम चांदीचा भाव 741 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 100 ग्रॅम चांदीचा भाव 7,410 रुपये सुरू आहे. 1000 ग्रॅम चांदीचा भाव 74,100 रुपयांनी सुरू आहे. त्यामुळे आजचे चांदीचे भाव गुरुवारच्या किमतीप्रमाणे स्थिर आहेत.

दरम्यान, सध्या राज्यात नवरात्र उत्सव सुरू आहे. त्यामुळे सराफ बाजारात सोने खरेदी करण्यासाठी लगबग दिसून येत आहे. मात्र सध्या सोन्याच्या किमती वाढल्यामुळे ग्राहकांची मोठी निराशा होत आहे. सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना सोने खरेदी करणे परवडण्याच्या बाहेर गेले आहे.