हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई पोलीस आयुक्त पदावरून उचलबांगडी करण्यात आलेल्या परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अतिशय धक्कादायक आरोप केले आहेत. देशमुख यांनी पोलीस अधिकारी सचिन वाझेंना दर महिन्याला १०० कोटी गोळा करायला सांगितले होते, असा आरोप करत सिंग यांनी खळबळ उडवून दिली आहे. यावरून भाजप नेते नारायण राणे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले आहे.100 कोटींच्या वसुली प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचाही संबंध असा गंभीर आरोप नारायण राणे यांनी केला आहे.
सचिन वाझे यांना मर्डर केसमध्ये वाचवण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी केलं. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांनाही माहिती दिली होती. मग मुख्यमंत्र्यांनी ती माहिती मिळताच अनिल देशमुखांवर कारवाई का नाही केली? त्यांना मुख्यमंत्र्यांनी का निलंबित केलं नाही? (१/३) #AnilDeshmukh #ParambirSingh
— Narayan Rane (@MeNarayanRane) March 20, 2021
परमबीर सिंग हे पोलीस अधिकार आहेत. त्यांनी अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. देशमुख यांनी वाझे यांना महिन्याला १०० कोटी रुपये वसूल करण्यासाठी सांगितले होते. मनसुख हिरेन यांच्या हत्या प्रकरणात वाझे यांना वाचवण्याचे काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
मुख्यमंत्र्यांनी कारवाई केली नाही, याचा अर्थ या १०० कोटी खंडणीच्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांचाही संबंध आहे. वाझेंना वाचवायचंही काम उद्धव ठाकरे करतात. मुख्यमंत्र्यांचा सर्व घटनांशी थेट संबंध आहे. त्यामुळे त्यांनी त्वरित राजीनामा देणं आवश्यक आहे. (२/३) #MaharashtraGovernment
— Narayan Rane (@MeNarayanRane) March 20, 2021
परमबीर सिंग यांनी वसुलीची माहिती ठाकरे यांना दिली होती. मात्र, मुख्यमंत्री ठाकरे यांनी देशमुख यांच्यावर कारवाई का केली नाही. याचा अर्थ मुख्यमंत्री ठाकरे यांचासुद्धा १०० कोटी वसुली प्रकरणात संबंध आहे. एक तर मुख्यमंत्री ठाकरे यांनी वाझे यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा,’ अशी मागणी भाजप नेते नारायण राणे यांनी केली.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा