महाराष्ट्राची वाट लावणाऱ्या व्यक्तीला विठ्ठल माफ करणार नाही; राणेंची मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका

0
35
Nilesh Rane Uddhav Thackarey
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आषाढी वारीच्या निमित्तानं राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे एकादशीच्या महापूजेसाठी मुंबईहून पंढरपूरकडे रवाना झाले आहेत. भर पावसात मुख्यमंत्री स्वत: ड्रायव्हिंग करत पंढपूरकडे निघाले आहेत. त्यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे सुद्धा आहेत. दरम्यान, उद्धव ठाकरे पंढरपूरला रवाना झाल्यानंतर भाजप नेते निलेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका केली आहे.

जो माणूस महाराष्ट्र हातात येऊन चालू शकला नाही, तो माणूस गाडी चालवत मुंबईबाहेर गेला तर त्यात काय मोठा पराक्रम??? विठ्ठलाची कितीही सेवा केली तरी या मुख्यमंत्र्याला विठ्ठल माफ करणार नाही. कारण, इतक्या सहजपणे महाराष्ट्राची वाट लावणाऱ्या व्यक्तीला माफी नाही’, अशा शब्दात निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

दरम्यान, राज्यातील खराब हवामान आणि मुसळधार पावसामुळे पंढरपूरच्या दिशेनं विमानाने जाणं शक्य नसल्यामुळे मुख्यमंत्री रस्तेमार्गानंच पंढरपूरच्या दिशेनं निघाले आहे. यावेळी मुख्यमंत्री स्वत: ड्रायव्हिंग करत आहेत. नेहमीची मर्सिडीज ऐवजी रेंज रोव्हर गाडी घेऊन मुख्यमंत्री पंढरपूरकडे निघाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here