पवार साहेबच दाऊदचा माणूस आहे; निलेश राणेंची टीका

sharad pawar nilesh rane
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते निलेश राणे यांनी नवाब मलिक प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरच थेट निशाणा साधला आहे. मला तर असा संशय आहे कि पवार साहेबच दाऊदचे माणूस आहेत अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे. ते सिंधुदुर्ग येथे पत्रकरांशी संवाद साधत होते.

निलेश राणे म्हणाले, नवाब मलिक हे पवारांचे खास आहेत. अनिल देशमुख मराठा होते, त्यांचा घेतला राजीनामा मग नवाब मलिकांसाठी वेगळा न्याय का? मला असा संशय येतो की पवारसाहेबच दाऊदचा माणूस आहे. ज्यानं दाऊदच्या बहिणीशी व्यवहार केला, त्यांचा राजीनामा का घेतला जात नाही? अनिल देशमुख यांचा मात्र पटकन राजीनामा घेतलात, मग नवाब मलिक कोण आहे? कोण लागतो शरद पवारांचा?’ असा सवाल निलेश राणे यांनी केला.

दरम्यान, निलेश राणे हे गेल्या काही दिवसांपासून सातत्त्याने पवार कुटुंबियांवर टीका करत आहेत. यापूर्वी देखील त्यांनी पवार साहेब हेच पाकिस्तानचे एजंट आहेत अशी टीका केली होती. तर दुसरीकडे नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक असून महाविकास आघाडी मात्र कोणत्याही मालिकांचा परिस्थितीत राजीनामा घेणार नाही यावर ठाम आहे