हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई वरून शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात जुंपली असतानाच त्यात भाजप नेते निलेश राणे यांनी उडी मारत शिवसेनेवर कडक शब्दांत निशाणा साधला.शिवसेनेला मराठी माणसाचा पुळका असता तर मुंबईत ५५ ते ६० टक्क्यावरून १८ टक्क्या पर्यंत मराठी टक्का घसरला नसता अस निलेश राणे यांनी म्हंटल.
यासंदर्भात निलेश राणे यांनी ट्विट करत म्हंटल की, १०५ हुतात्मे व असंख्य मराठी माणसांमुळे मुंबई महाराष्ट्रात राहिली. शिवसेनेचा तेव्हा नामोनिशान नव्हता. तेव्हा अनेकांनी झुंज दिली आणि मुंबईसहित महाराष्ट्र उभा राहिला. शिवसेनेला मराठी माणसाचा पुळका असता तर मुंबईत ५५ ते ६० टक्क्यावरून १८ टक्क्या पर्यंत मराठी टक्का घसरला नसता
१०५ हुतात्मे व असंख्य मराठी माणसांमुळे मुंबई महाराष्ट्रात राहिली. शिवसेनेचा तेव्हा नामोनिशान नव्हता. तेव्हा अनेकांनी झुंज दिली आणि मुंबईसहित महाराष्ट्र उभा राहिला. शिवसेनेला मराठी माणसाचा पुळका असता तर मुंबईत ५५ ते ६० टक्क्यावरून १८ टक्क्या पर्यंत मराठी टक्का घसरला नसता.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) June 11, 2021
संजय राऊत काय म्हणाले होते –
शिवसेनेमुळे मुंबई महाराष्ट्रात राहिली हे लक्षात ठेवा. संयुक्त महाराष्ट्रानंतर मुंबई केंद्रशासित प्रदेश होणार वा महाराष्ट्राच्या हातून निसटणार, असे प्रसंग उभे झाले होते. पण शिवसेनेने बाणेदारपणे मुंबई महाराष्ट्रात ठेवली. शिवसेनेने मुंबई महाराष्ट्रात ठेवली अन् मुंबईवर मराठी माणसाचा पगडा कायम ठेवला असेही राऊत यांनी म्हंटल.मुंबईसाठी शिवसेनेच्या योगदानाची लंबी यादी देता येईल. रस्ते, पाण्यापासून स्थानिकांना रोजगारापर्यंतची अनेक कामे शिवसेनेने केलेली आहेत. असेही राऊतांनी सांगितले.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.