हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई पोलिसांना दिवाळीनिमित्त मुंबईतील सहा पोलीस कॅन्टीनमध्ये दिवाळीनिमित्त खरेदीसाठी ७५० रुपयांची सूट देण्यात आली आहे. त्यावर भाजप नेते निलेश राणे यांनी संताप व्यक्त केला. आता मुंबई पोलिसांनीच त्यांच्या बंदुकीचा वापर करून ठाकरे सरकारला घोडा लावला पाहिजे अशी घणाघाती टीका निलेश राणे यांनी केली.
निलेश राणे यांनी ट्विट करत म्हंटल की, ठाकरे सरकारकडून मुंबई पोलिसांना दिवाळी बोनस केवळ ७५० रुपये, अपेक्षेपेक्षा पाचशे रुपये जास्तच दिले म्हणावं लागेल कारण ठाकरे सरकार आहे. बोलण्यासारखं आता राहिलं नाही, आता पोलिसांनीच त्यांच्या बंदुकीचा वापर करून ठाकरे सरकारला घोडा लावला पाहिजे त्याशिवाय सुधारणार नाही हे लोकं.’ अशी टीका निलेश राणेंनी ठाकरे सरकारवर केली आहे.
ठाकरे सरकार कडून मुंबई पोलिसांना दिवाळी बोनस केवळ ७५० रुपये, अपेक्षेपेक्षा पाचशे रुपये जास्तच दिले म्हणावं लागेल कारण ठाकरे सरकार आहे. बोलण्यासारखं आता राहिलं नाही, आता पोलिसांनीच त्यांच्या बंदुकीचा वापर करून ठाकरे सरकारला घोडा लावला पाहिजे त्याशिवाय सुधारणार नाही हे लोकं. pic.twitter.com/3ilvIohjMw
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) October 30, 2021
काय आहे प्रकरण-
मुंबई पोलिसांना दिवाळीनिमित्त मुंबईतील सहा पोलीस कॅन्टीनमध्ये दिवाळीनिमित्त खरेदीसाठी ७५० रुपयांची सूट देण्यात आली आहे. सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना दिवाळी सणानिमित्त शुभेच्छापत्र, दिवाळी फराळ, मिठाई, आणि छोटीसी भेटवस्तू देण्याची परंपरा आहे. या दिवाळी शुभेच्छा खर्चासाठी मुंबई पोलीस कल्याण निधीचा वापर करण्यात येतो. ही योजना राज्यशासनाची नसून पूर्णतः पोलीस कल्याण निधीची योजना आहे.