प्रताप सरनाईकांना गुडघे पण जेल मध्येच टेकावे लागतील, त्यांना माफी नाही; राणेंचा हल्लाबोल

0
44
nilesh rane pratap sarnaik
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून ईडीच्या रडारावर असलेल्या शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी अचानकपणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना थेट पत्र लिहून भाजप सोबत जुळवून घेण्याचे आवाहन केलं. दरम्यान या लेटरबॉम्ब बाबत भाजप नेते निलेश राणे यांना विचारलं असता त्यांनी प्रताप सरनाईक आणि शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे.

प्रताप सरनाईक यांना आता तुरुंग दिसायला लागलं आहे. यांचे सगळे मंत्री आहेत त्यांना जेल आता जवळ दिसतेय म्हणून युती पाहिजे. जेलमध्ये जायचं नसेल तर काय करायचं तर भाजप समोर गुडघे टेका आणि बघा कुठे माफी मिळते का. पण अशी माफी मिळत नाही. त्यांना गुडघे पण जेल मध्येच टेकावे लागतील. त्यांना माफी नाही,’ असं वक्तव्य निलेश राणे यांनी केलं आहे.

दरम्यान भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी देखील सरनाईक यांच्यावर निशाणा साधला. प्रताप सरनाईक जेलच्या भीतीने चिंताग्रस्त दिसत आहेत आणि आता सरनाईकनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भाजपा यांच्याशी हातमिळवणी करावी अशी विनवणी केली आहे. सर्व घोटाळेबाज प्रताप सरनाईक, अनिल परब, रवींद्र वायकर जेलचे पाहुणे होणारच,” असे सोमय्या यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here