बाळासाहेबांनी पक्षाची सुरुवात केली वाघांना घेऊन.. संपणार कुत्र्यांमुळे – राणेंची जळजळीत टिका

Nilesh Rane Uddhav Thackarey
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते निलेश राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा साधला आहे. शिवसेना वर्धापनदिनी लावलेल्या एका बॅनरचा संदर्भ घेऊन त्यांनी सेनेवर टीकास्त्र सोडलं तसेच, शिवसेनेचे स्थानिक आमदार वैभव नाईक यांच्यावर देखील त्यांनी निशाणा साधला. कालच वैभव नाईक आणि राणे समर्थक यांच्यात पेट्रोल पंपावर खडाजंगी झाली होती.

निलेश राणे यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या एका बॅनरचा फोटो ट्वीट करून शिवसेनेवर निशाणा साधला आहे. “शिवसेनेचा वर्धापन दिनाचा बॅनर पण शिवसेना आमदार नाईकसारखा निघाला. एका तासात उलटा झाला. शिवसेना पक्षाची हालत पण या बॅनरसारखीच झाली आहे. वाईट वाटतं स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंसाठी. त्यांनी पक्षाची सुरुवात केली वाघांना घेऊन. संपणार कुत्र्यांमुळे”, असं ट्वीट निलेश राणे यांनी केलं आहे.

नाईक- राणे समर्थकांमध्ये राडा

सिंधुदुर्गमध्ये एका पेट्रोलपंपावर शिवसेना आणि राणेसमर्थक कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त आमदार वैभव नाईक यांनी एका पेट्रोल पंपावर मोफत पेट्रोल वाटायला सुरुवात केली. भाजपाला पेट्रोल दरवाढीवरून खिजवण्यासाठी हा प्रकार केल्याचं बोललं जात होतं. हा प्रकार लक्षात आल्यानंतर राणेसमर्थक भाजपा कार्यकर्ते तिथे पोहोचले. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची सुरू झाली. यावेळी आमदार वैभव नाईक देखील त्यामध्ये पडले होते, पण तेवढ्यात पोलिसांनी मध्ये पडत हा प्रकार थांबवला.

स्वत:ला सांभाळा अन्यथा तुम्हांला शिवथाळी मिळेल- नारायण राणे

दरम्यान, कालच भाजप नेते नारायण राणे यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला होता. संजय राऊत यांनी दादागिरीची भाषा करु नये. प्रसाद वाटत असाल, तर प्रसादाची परतफेड कशी द्यायची हे आम्ही शिकलो आहेत. शिवसेनेत असतानाच हे शिकलो आहे असे नारायण राणे म्हणाले. स्वत:ला सांभाळा अन्यथा तुमच्या वाट्याला शिवथाळी कधी येईल ते समजणार नाही असा इशारा देखील त्यांनी दिला.