स्वप्नीलची आत्महत्या म्हणजे ठाकरे सरकारने केलेला मर्डर; निलेश राणे संतापले

0
43
Nilesh rane and uddhav thakarey
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची  परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्यानं स्वप्नील लोणकर या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्यानंतर सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान या घटनेनंतर भाजप नेते निलेश राणे यांनी ठाकरे सरकार वर संताप व्यक्त करत ही आत्महत्या नसून सरकारने केलेला मर्डर आहे असा आरोप केला आहे.

निलेश राणे ट्विट करत म्हणाले की, ‘ठाकरे सरकारने केलेली ही मर्डर आहे. हे सरकार स्वतःच्या मस्तीत असल्यामुळे त्यांचे महत्त्वाच्या विषयाकडे लक्ष नाही. एमपीएससी हा विषय इतक्या वेळा ऐरणीवर येऊन सुद्धा राज्य सरकारने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी या घटनेनंतर राज्य सरकारला लवकरात लवकर परीक्षा घेण्याची विनंती केली आहे. कोरोनामुळं स्थगित केलेली MPSC ची परीक्षा आणि प्रलंबित निकाल व नियुक्त्यांमुळं युवा पिढी नैराश्यात आहे. माझी राज्य सरकारला विनंती आहे की, आवश्यक ती सर्व दक्षता घेऊन ही परीक्षा त्वरित घेण्यात यावी आणि प्रलंबित नियुक्त्याही तातडीने देण्यात याव्यात असे रोहित पवार यांनी म्हंटल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here