आत्ताची शिवसेना दाऊदची बी टीम; राणेंचा घणाघात

0
96
nitesh rane uddhav thackeray
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एमआयएम ही भाजपची बी टीम आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल म्हंटल होत त्यांवर आज भाजप आमदार नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आम्हाला कोणाची बी टीम म्हणण्यापेक्षा आत्ताची शिवसेनाच दाऊदची बी टीम झाली आहे अशी जळजळीत टीका नितेश राणे यांनी केली आहे.

आताची शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना राहिलेली नाही. कारण आताची शिवसेना ही दाऊदची इब्राहिमची बी टीम झालेली आहे. हिंदुत्व सोडलंय म्हणून ते अजाणची स्पर्धा घेतात. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना जनाब बाळासाहेब हे शिवसेनेनेच आपल्या कॅलेंडरवर म्हटलं आहे. हिंदूंचा प्रत्येक सण आला की त्याच्यावर विरजण टाकणारे हेच उद्धव ठाकरेंचं सरकार आहे. अन्य धर्मांच्या सणांवर कुठेही तुम्हाला निर्बंध दिसणार नाहीत असे नितेश राणे यांनी म्हंटल.

दरम्यान, यावेळी त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांचाही समाचार घेतला. संजय राऊतांसारखी माणसं सोलापूरच्या बाजारात खूप भेटतात. त्याला की महत्व द्यायचं हे आपण ठरवून घेतलंय. ज्यांना हिंदूंविषयी द्वेष आहे तीच लोकं काश्मीर फाईल्सच्या विरोधात बोलताहेत असेही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here