राऊत साहेब, नशामुक्तीची सुरुवात कलानगरातून करा; राणेंच्या निशाण्यावर मुख्यमंत्री

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काही लोक गांजा पिऊन बोलत असतात त्यामुळे महाराष्ट्रात तातडीने नशा मुक्ती कार्यक्रम हाती घेणे गरजेचे आहे. अस म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप आमदार नितेश राणे आणि प्रसाद लाड यांच्यावर टीका केली होती. या टिकेनंतर नितेश राणे यांनीदेखील प्रत्युत्तर देत करताना मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.

नितेश राणे म्हणाले, एकदम बरोबर बोललात राऊत साहेब, महाराष्ट्र नशामुक्त झालाच पाहिजे.. पण.. त्याची सुरुवात तुमच्या मालकाच्या “कलानगरातून” करा.. जेणेकरून रोज संध्याकाळी DINO च्या घरी होणारे कार्यक्रम एकदाचेच संपतील..!!!

नशामुक्त महाराष्ट्र बरोबर “महिलांसाठी सुरक्षित महाराष्ट्र” हाही कार्यक्रम तातडीने घेतला पाहिजे..जेणेकरून डॉ. स्वप्ना पाटकर सारख्या महिलांना न्याय भेटेल! बरोबर ना राऊत साहेब? असे म्हणत नितेश राणे यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला.

संजय राऊत नेमकं काय म्हणाले-

महाराष्ट्रात तातडीने नशा मुक्ती कार्यक्रम हाती घेणे गरजेचे आहे. नाहीतर राजकीय गांजाडयांना मराठी माणूस शिवसेना भवनाच्या फुटपाथवर बेदम चोपलयाशिवाय राहणार नाही.( समझनेवालोंको इशारा काफी है..) शिवसेना भवन हे मराठी अस्मितेचे ज्वलंत प्रतीक आहे. बाटगयांना हे कसे समजणार? अस ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे.

Leave a Comment