हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं असून राजकीय नेत्यांकडून एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप होत आहेत. आरक्षण रद्द झाल्याने मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा समाजाकडून पुन्हा एकदा मोर्चा काढण्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
याच पार्श्वभूमीवर भाजप नेते नितेश राणे यांनी सरकारला इशारा दिला आहे. तिसरी लाट कोरोनाची नाही, मराठ्यांची असेल’ असं ट्विट नितेश राणे यांनी केलं आहे.
एक मराठा लाख मराठा !!! pic.twitter.com/iEpjJAyP7R
— nitesh rane (@NiteshNRane) May 6, 2021
दरम्यान, लॉकडाऊन संपल्यावर 16 मे पासून मोर्चा काढण्यावर मराठा समाजाच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत एकमत झालं आहे. बीडमधून पहिला मोर्चा काढला जाणार आहे. उद्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. हे मोर्चे राज्यभरात काढण्यात येतील, अशी माहिती विनायक मेटे यांनी दिली.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.