हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कोरोनाच्या महासंकटामुळे लॉकडाऊन असलेलं महाराष्ट्र एकीकडे हळू हळू अनलॉक होत असताना दुसरीकडे मात्र भविरोधी पक्ष भाजपने मंदिरं उघडण्याची मागणी ठाकरे सरकारला केली. या मागणीसाठी भाजपा रस्त्यावर उतरलं आहे. यामुळे कोरोनाचं संकट बाजूलाच पण सत्ताधारी आणि विरोधक असं सत्तानाट्य महाराष्ट्र पाहत आहे. कोरोनासारख्या जीवघेण्या संकटामध्ये भाजपने राज्यभर मंदिरं खुली करण्याच्या मागणीसाठी घंटानाद आंदोलन केलं. यावर आज सामनातून जहरी टीका करण्यात आली होती. याच टीकेला आता भाजपकडूनही चोख प्रत्यूत्तर आलं आहे.
‘ज्यांच्या नेत्यांचा श्वास मंदिरात घुसमटतो आणि नाईट लाईफमुळे फुलतो त्यांची वृत्तपत्रं मंदिरं बंदीच्या बाजूनेच बोलणार’ अशी घणाघाती टीका भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून भाजपच्या आंदोलनावर जहरी टीका करण्यात आली. ‘भाजपचं घंटानाद आंदोलन हे धार्मिक होतं की राजकीय?’ असा सवाल शिवसेनेकडून विचारण्यात आला. त्यावर भातखळकर यांनी प्रत्यूत्तर दिलं आहे.
दारू मधून जसा पैसा येतो तसा पैसा मंदिरांमधून मिळाला असता तर यांनी मंदिराचे दरवाजे कधीच उघडे ठेवले असते’ अशीही घणाघाती टीका भातखळकर यांनी केली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’