हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून आता दिग्गज भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना आता कोरोनाची लागण झाली आहे. पंकजा यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. त्यांच्यावर घरीच उपचार सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.
माझ्या कोरोनाचा चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मी आधीच सावधगिरी बाळगून स्वत:ला विलग केलं होतं. मी गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुळे मृत्यू झालेल्या बऱ्याच कुटुंबियांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. त्याच वेळी कदाचित मला कोरोनाचा प्रादुर्भाव झाला असेल. त्यामुळे या काळात जे कोणी माझ्या संपर्कात आले आहेत. त्यांनी स्वत:ची कोरोना चाचणी करुन घ्यावी. तसेच काळजी घ्या, असे ट्वीट पंकजा मुंडे यांनी केले आहे.
I m tested Corona positive…I m already Isolated taking precautions.. I met so many people n families of Corona victims I must have caught there ..those who were with me plz get ur tests done..take care ..
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) April 29, 2021
दरम्यान काही दिवसांपूर्वी पंकजा यांच्या बहीण आणि भाजप खासदार प्रितम मुंडे यांना कोरोनाची लक्षणं दिसू लागली होती. त्यांनी आपली RTPCR कोरोना चाचणी केली होती. मात्र, त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. त्यानंतर त्या घरीच विलगीकरणात थांबल्या होत्या.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.