हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीकडून कारवाई करण्यात आल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा राजकिय वातावरण तापलं असून भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत. प्रताप सरनाईक घरी नसताना ईडीने धाड टाकली, ही नामर्दांगी आहे, अशी टीका संजय राऊतांनी भाजपवर केली होती. राऊतांच्या या विधानाला भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. घरी नसताना एका महिलेचं ऑफिस फौजफाटा नेऊन तोडलं, यात कोणती मर्दानगी? असा थेट सवाल दरेकरांनी संजय राऊत यांना केला आहे.
“प्रताप सरनाईक घरी नसताना ईडीने धाड टाकली,यात कसली मर्दानगी”,असं म्हणणाऱ्या संजय राऊत यांना विचारलं पाहिजे, एक महिला घरी नसताना… सर्व लवाजमा आणि फौजफाटा घेऊन तिचं ऑफिस उद्ध्वस्त केलं, यात कोणती मर्दानगी होती?”, असा सवाल दरेकरांनी केला आहे
काय म्हणाले होते संजय राऊत
“गेल्या काही दिवसांपासून ईडी, सीबीआय या यंत्रणा गुलाम, आणि नोकर असल्यासारखे वागत असतील तरी आम्ही पर्वा करत नाही. आज प्रताप सरनाईक त्यांच्या घरी नाही आहेत. त्यांची मुले घरी आहेत. हे पाहून त्यांनी जी धाड टाकली ही नामर्दांगी आहे. भाजपने सरळ लढाई करावी. हे शिखंडीसारखे यंत्रणांच्या आडून कारवाई करु नका”, असा घणाघात संजय राऊतांनी भाजपवर केला होता.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’




