हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरु होत आहे. यंदाचे अधिवेशन नागपूरला न होता ते मुंबईत होत आहे. यावेळी प्रश्नोत्तराच्या वेळी गेवराईचे भाजप आमदार लक्ष्मण पवार यांनी वाळूच्या अवैध उत्खननावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच वाळूच्या अवैध उत्खननामुळे ज्या ८ जणांचा मृत्यू झाला आहे त्यांच्या कुटुंबीयांची जबाबदारी सरकार घेणार का असा सवाल केला आहे.
गोदावरी आणि सिंदफणा या नदीवर अवैध वाळूचा उपसा होत आहे अशी माहिती आमदार लक्ष्मण पवार यांनी दिली . वाळूच्या अवैध उत्खननामुळे नदीपात्रा मध्ये १० ते १५ फुटांचे खड्डे खोदले गेले आहेत त्यामुळे दुर्घटना होऊन अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. मागीलवर्षी जवळपास ८ लोकांचा जीव गेला आहे. त्यांच्या पाल्यांची जबाबदारी सरकार घेणार का असा सवाल लक्ष्मण पवार यांनी केला
आपल्याला वाळूचे अवैध उत्खनन थांबवायचे असेल तर त्या वाळूचा लिलाव योग्य रीतीने झाला पाहिजे. वाळूची अपसेट किंमत जास्त असल्याने सर्वसामान्य लोकांना घेता येत नसून काही ठराविक लोकच ती घेत आहेत आणि नंतर त्यांना ते परवडत नसल्याने ते अधिकचे उत्खनन करतात. अवैध्य उत्खननामुळे खराब झालेल्या रस्त्यांची जबाबदारी कोण घेणार असा सवाल लक्ष्मण पवार यांनी केला
तसेच ह्या ८ लोकांचा या अवैध खड्ड्यांमुळे मृत्यू झाला आहे त्यांना कोणतीही मदत राज्य सरकारने केलेली नाही. राज्य सरकार या लोकांची जबाबदारी घेणार आहे का असा सवाल त्यांनी केला . तसेच इथून पुढे ट्रॅक्टर च्या माध्यमातून वाहतुकीला राज्य सरकार परवानगी देणार आहे का असा प्रश्न त्यांनी राज्य सरकारला विचारला