हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर तिसऱ्या आघाडीच्या चर्चाना उधाण आले. यावेळी त्यांनी थेट युपीए वर हल्लाबोल करत काँग्रेसला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. या एकूण सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी थेट शरद पवारांवर निशाणा साधला आहे. पवारांनी स्वतः बोलण्या ऐवजी ममता बॅनर्जींच्या तोंडी ते वक्तव्य घातले अस विखे पाटील म्हणाले.
युपीएचे विसर्जन झाले आहे अस ममता बॅनर्जी म्हणाल्या पण मला नाही वाटत की, ते शरद पवार यांच्याशी बोलल्याशिवाय एवढे मोठे वक्तव्य करतील. कारण, महाराष्ट्रात सत्तेमध्ये राहण्याचे जे साधन राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाले आहे. त्यामुळे पवार स्वतः बोलण्या ऐवजी ममता बॅनर्जींच्या तोंडी वक्तव्य घातले आहे. एक प्रकारे या विधानामुळे काँग्रेसलाच स्वतःचे विसर्जन करण्याची वेळ आलेली आहे, अशी टीका ही राधाकृष्ण विखे पाटलांनी केली आहे.
ममता बॅनर्जी नेमकं काय म्हणाल्या-
भाजप विरोधात जे लढतील त्या सर्वांना एकत्र घेणार असून यूपीए व्यतिरिक्त वेगळा पर्याय देणार असल्याचं ममता बॅनर्जींनी संकेत दिले आहेत. ममता बँनर्जी म्हणाल्या होत्या की, “काय आहे यूपीए? यूपीए आता उरली नाही. जो फिल्डमध्ये राहून, तळागाळात उतरुन लढू शकतो तो स्ट्राँग विरोधक. जो लढतच नाही त्याला आम्ही काय म्हणणार? अस म्हणत त्यांनी काँग्रेस वर निशाणा साधला होता.