हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अनधिकृत बांधकाम प्रकरणी अभिनेता सोनू सूदविरोधात मुंबई महापालिकेने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. जुहू येथील सहामजली निवासी इमारत आवश्यक परवानग्या न घेता हॉटेलमध्ये रुपांतरित केल्याचा आरोप सोनू सूद वर मुंबई महापालिकेकडून करण्यात आला आहे. दरम्यान भाजप नेते राम कदम यांनी यावरून महाराष्ट्रातील ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केला आहे.
कोरोना संकटाच्या काळात सोनू सूद यांनी गरीब मजुरांना त्यांच्या गावी पाठवण्यासाठी मदत केली. हे काम महाविकास आघा़डी सरकारनं करायलं हवं होतं. मात्र, ही गोष्ट सरकारला आवडली नाही,त्यामुळे बदल्याच्या भावनेतून कंगना रणौत आणि आता सोनू सूद यांच्याविरोधात कारवाई करण्यात येतीय, असं राम कदम म्हणाले. महाविकास आघाडी सरकार किती जणांचे आवाज दाबणर असा सवाल राम कदम यांनी विचारला आहे.
#corona के संकट काल में actor @SonuSood जी ने खुद के पैसों से गरीब मजदूरों को उनके गाँव भेजने में सहायता की थी. हालाकी यह काम #MVA महाराष्ट्र सरकार का था. उन्हें यह बात रास नहीं आयी. क्या
उसी वज़ह से बदले के भाव में @KanganaTeam के बाद अब @SonuSood की बारी?— Ram Kadam (@ramkadam) January 7, 2021
नक्की काय आहे प्रकरण –
प्रसिद्ध अभिनेता सोनू सूद विरोधात मुंबई महापालिकेने जुहू पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. जुहू येथील सहा मजली निवासी इमारत आवश्यक परवानग्या न घेता हॉटेलमध्ये रुपांतर केल्याप्रकरणी बीएमसीने अभिनेता सोनू सूदविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मुंबई महापालिकेने जुहू पोलिसांकडे तक्रार करुन सोनू सूद विरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’