सचिन वाझे यांची नार्को टेस्ट करा ; राम कदमांची मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवल्याच्या कटात सहभागी असल्याचा ठपका ठेवत राष्ट्रीय तपास यंत्रणेने पोलीस अधिकारी सचिन वाझे  यांना शनिवारी रात्री अटक केली होती. वांझेंच्या अटकेनंतर भाजपा नेते अजून आक्रमक झाले असून या कटात सहभागी असलेल्या लोकांची नावे समोर येण्यासाठी सचिन वाझे यांची नार्को टेस्ट केली जावी, अशी मागणी भाजपचे नेते राम कदम यांनी केली आहे.

मी यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले आहे. कर नाही त्याला डर कशाला पाहिजे. त्यामुळे सचिन वाझे यांची नार्को टेस्ट करून दूध का दूध पानी का पानी होऊ जाऊ दे. सचिन वाझे यांची नार्को टेस्ट झाली नाही तर ठाकरे सरकारचा खरा चेहरा लोकांसमोर येईल, असे राम कदम यांनी म्हटले.

दरम्यान, भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी आता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे. सचिन वाझेला अटक झाली. पण त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करणारे मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनाही जाब द्यावाच लागेल, असे सोमय्या यांनी म्हटले.

Leave a Comment