एकनाथ खडसे सिंचन घोटाळ्यातील प्रमुख साक्षीदार, म्हणून राष्ट्रवादीने त्यांना फोडले – राम शिंदेंचा दावा

Ram Shinde
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांनी एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर जोरदार टीका केली. एकनाथ खडसे सिंचन घोटाळ्यातील प्रमुख साक्षीदार असल्यानेच त्यांना राष्ट्रवादीने फोडलं, असा गंभीर आरोप राम शिंदे यांनी केला आहे. अहमदनगरला कर्जत इथे ते पत्रकारांशी बोलत होते.या दरम्यान त्यांनी हे विधान केलं आहे.

70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याप्रकरणी सध्या ईडीची (सक्तवसुली संचालनालय) चौकशी सुरु आहे. याप्रकरणी खडसे विरोधी पक्षनेते असताना ते प्रमुख साक्षीदार होते. त्यामुळे त्यातील साक्षीदार फोडण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीने केला आहे, असा आरोप राम शिंदे यांनी केला आहे.

रोहित पवारांनी एका वर्षात एकही काम आणलं नाही

‘निवडणुकीत पवार घराण्याचा उमेदवार होता. त्यामुळे बारामती पॅटर्नची खूप चर्चा झाली. मात्र, एक वर्षानंतरही मी केलेल्या कामाचं भूमिपूजन मंत्र्यांनच्या हस्ते झाले असतांना ते पुन्हा करत आहेत’ अशी टीका यावेळी शिंदे यांनी केली आहे. इतकंच नाही तर तुकाई उपसा सिंचन योजनेसह अनेक कामं बंद पाडली. एक वर्षात त्यांनी एकही काम आणलं नाही. त्यामुळे बारामती पॅटर्न सपशेल अपयशी ठरला असुन लोकांची घोर निराशा झाली आहे असा आरोप शिंदे यांनी केला आहे.

आमदार रोहित पवारांनी एक वर्षात फक्त कोंबड्यांची पिल्लं, मासे आणि बी बियाणे इकडे आणून विकली. त्यामुळे ते समाजकारण करण्यासाठी नाही तर धंदा करण्यासाठी आले आहेत अशी गंभीर टीका राम शिंदे यांनी केली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’