ज्यावर्षी बकऱ्याशिवाय बकरी ईद साजरी केली जाईल, तेव्हाच फटाक्यांशिवाय दिवाळी साजरी होईल ; भाजप खासदारांचे वादग्रस्त वक्तव्य

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोनामुळे यंदा दिवाळी साधेपणानं साजरी करावी, असे आवाहन प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जनतेला केले आहे. मात्र याचबरोबर दिल्ली, राजस्थान, ओडिशा, चंदीगड, कर्नाटक यांनी दिवाळीत फटाक्यांवर बंदी घातली आहे. दिवाळीत प्रदूषण होऊ नये ही बाब विचारात घेऊन फटाके फोडणे टाळावे त्याऐवजी दिव्यांची आरास करून दिवाळी साजरी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. मात्र या निर्णयावर भारतीय जनता पक्षाचे खासदार साक्षी महाराज यांनी आक्षेप घेत वादग्रस्त टिप्पणी केली आहे.

दिवाळीच्या फटाक्यांबाबत देशात असंतोष असताना खासदार साक्षी महाराज यांनी फेसबुक पेजवर एक वादग्रस्त पोस्ट केली आहे. फटाक्यांबाबत साक्षी महाराजांनी फेसबुकवर लिहिले आहे की, ज्यावर्षी बकऱ्याशिवाय बकरी ईद साजरी केली जाईल, तेव्हा फटाक्यांशिवाय दिवाळी साजरी होईल. फटाके न फोडण्याच्या राज्यांच्या निर्णयावर साक्षी महाराज यांनी फेसबुकवर जोरदार भाष्य केले आहे.

खासदार साक्षी महाराज हे नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असतात. हे भाजपचे फायर ब्रँड नेता म्हणून मोजले जाते. सध्या साक्षी महाराज कोरोना पॉझिटिव्ह असल्यामुळे दिल्लीच आयसोलेशनमध्ये आहेत. दरम्यान साक्षी महाराज यांनी केलेल्या पोस्टवर अनेकांनी टीकाही केली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment