नवी दिल्ली । सोमवारी रात्री लडाखमध्ये गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांनी केलेल्या हल्ल्यात २० भारतीय जवान शहीद झाले. या घटनेनंतर देशात चीनविरोधात संतापाची लाट उसळली आहे. विरोधी पक्षांनी चीनबाबत सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. यामुळे केंद्रातील मोदी सरकारवर चीनविषयी ठोस भूमिका घेण्यासाठीचा दबाव वाढला आहे. आता भाजपचे सरचिटणीस राम माधव यांनी चीनसंदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे. चीनविरोधात कठोर कारवाई करण्याचे संकेत त्यांनी दिलेत. जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, असं पंतप्रधान मोदी म्हणाले आहे. यामुळे सरकारच्या मनात निश्चितच कुठलातरी विचार असेल, असं राम माधव म्हणाले.
मोदी सरकारचं पुढचं पाऊल काय असेल याची आपण वाट बघूया. जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही असं पंतप्रधान मोदी सांगत असतील तर याचा अर्थ नक्कीच व्यर्थ जाणार नाही. चिनी सैनिकांनी सीमेवर भारतीय जवानांचा नरसंहार केला आहे. राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून सर्वपक्षांनी या घटनेचा निषेध केला पाहिजे, असं राम माधव म्हणाले. यामुद्द्यावर त्यांनी एका वृत्त वाहिनीला मुलाखत दिली. त्यावेळी ते बोलत होते.
सरकारचं पुढचं पाऊल काय असेल याची आपण वाट बघूया. जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही असं पंतप्रधान मोदी सांगत असतील तर याचा अर्थ नक्कीच व्यर्थ जाणार नाही. चिनी सैनिकांनी सीमेवर भारतीय जवानांचा नरसंहार केला आहे. राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून सर्वपक्षांनी या घटनेचा निषेध केला पाहिजे, असं राम माधव म्हणाले. यामुद्द्यावर त्यांनी एका वृत्त वाहिनीला मुलाखत दिली. त्यावेळी ते बोलत होते.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”