आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका भाजप -शिवसेना एकत्र लढणार – शंभुराज देसाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकेच्या निवडणूका भाजप आणि शिवसेना एकत्र लढणार असल्याचे राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले. ते कराड विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.

राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजप आणि शिवसेनेचं सरकार आलं तेव्हाच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केंद्र सरकार तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभं आहे अस सांगितले होत. त्यामुळे आमची अस म्हणणं आहे की महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूक आम्ही युती करूनच लढू अस शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले.

शिंदे सरकारचे काम एकदम फास्ट आहे. शिंदे सरकार हे पाठीमागील अडीच वर्षातील सरकार सारख शांत बसणारे नाही. एकनाथ शिंदे 20 तास काम करतात. पहाटे 3-4 पर्यंत ते फिल्ड वर असतात. त्यामुळे तेच जर इतकं काम करत असतील तर आम्ही पण जास्तीत जास्त काम केलं पाहिजे अस देसाई म्हणाले.

यावेळी त्यांनी वेदांता प्रकल्पावरून महाविकास आघाडीला जबाबदार धरले. राज्यात शिंदे सरकार येण्यापूर्वीच वेदांत प्रकल्प राज्याबाहेर गेला होता त्यामुळे यासाठी शिंदे फडणवीसांना जबाबदार धरणे योग्य नाही. महाविकास आघाडीच्या काळात वेदांताचा mou सुद्धा साइन झाला नव्हता. फक्त चर्चा सुरू होत्या.. कदाचित त्या चर्चातून वेदांताचे समाधान झाले नसेल अस शंभूराज देसाई यांनी म्हंटल.