आघाडी सरकार पोलीस अन गुंडांच्या जोरावर चाललंय, चंद्रकांत पाटलांची टीका

0
33
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या जन आशीर्वाद यात्रेतून भाजपनेते तथा कॅबिनेट मंत्री नारायण राणे यांनी आज मुख्यमंत्री ठाकरेंवर पुन्हा हल्लाबोल केला. त्यांच्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आघाडी सरकारवर निशाणा साधला. सत्तेतील महाविकास आघाडी सरकार पोलीस व गुंडांच्या जोरावर चाललेले आहे, अशा शब्दात पाटील यांनी टीका केली.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकार व शिवसेना पक्षावर जोरदार हल्ला केला. चंद्रकांत पाटलांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पाटील म्हणाले की, हे सरकार पोलीस व गुंडांच्या जोरावर चाललले आहे. मंत्री नारायण राणे यांच्या अटकेच्या प्रकरणात सहभागी असलेल्या परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधात याचिका दाखल करण्याचं काम सुरु आहे. कायद्याच्या दृष्टीने केसेस दाखल होत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, महाविकास आघाडीतील तीन पक्षांकडून आता शेवटची तडफड केली जात आहे. उद्धव ठाकरे यांना असे वाटत आहे कि आम्ही तुटू फुटू. पण आम्ही सुद्धा संयमाने एक एक बॉम्ब टाकतो आणि गायब होतो. हि गोष्ट त्यांनी लक्षात घ्यावी. सत्ता गेल्यानंतर मनस्थिती टिकवणे अवघड आहे. पण इथून कुणीही जाणार नाही, असा असे पाटील यांनी म्हंटले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here