भाजप ताकदवान मात्र 100 पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत, प्रशांत किशोर यांचा दावा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : तृणमूल काँग्रेसचे रणनीतिकार प्रशांत किशोर यांची एक ऑडिओ क्लिप मागे व्हायरल झाली होती. यात त्यांनी टीएमसी आणि भाजपबद्दल अनेक मोठी विधानं केली होती. आता पुन्हा एकदा त्यांनी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूकीत भाजप ताकदवान असल्याचं म्हटलं आहे. मात्र, यावेळी त्यांनी असा दावाही केला आहे, की यावेळीदेखील मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मोठ्या अंतरानं विजय मिळवतील. एका मीडिया रिपोर्टनुसार, किशोर म्हणाले, बंगालमध्ये काही जागांवर सत्तेविरोधात लाट आहे, मात्र ती स्थानिक नेत्यांविरोधात आहे. याला पक्षानं दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.

किशोर यांनी दावा केला आहे, की लोकांमध्ये ममतांविरोधात असंतोष नाही. त्या आतादेखील बंगालमधील एक लोकप्रिय नेत्या आहेत. ज्याला कोणाला बंगाल समजतं, तो सहज सांगू शकतो की टीएमसी आणि ममतांसाठी महिला मोठ्या प्रमाणात मत देतात. किशोर म्हणाले, की मी माझ्या 8-10 वर्षाच्या अनुभवात कोणतीही महिला नेता इतकी लोकप्रिय असल्याचं पाहिलं नाही. माझं असं मत आहे, की ममता बॅनर्जी मोठ्या अंतरानं विजय मिळवतील.

भाजपबद्दल बोलताना किशोर म्हणाले, की भाजप राज्यात ताकदवान आहे. मात्र, भाजप 100 जागांपेक्षा अधिक ठिकाणी विजय मिळवू शकणार नाही आणि तृणमूलचा विजय होईल. एका पब्लिक प्लॅटफॉर्मवर केलेली बातचीत व्हायरल झालेली या ऑडिओ क्लिपबद्दल किशोर म्हणाले, की पब्लिक प्लॅटफॉर्मवर असलेली चॅट ते लिक कसं करू शकतात?

किशोर म्हणाले की, ‘मोदीजींची लोकप्रियता हा एक घटक आहे. ध्रुवीकरण, दलितांचा एक मोठा वर्ग भाजपाला पाठिंबा देत आहे आणि हिंदी भाषिकांवर भाजपची पकड आहे. हे सर्व घटक भाजपला निवडणुकीत मदत करतील. ते म्हणाले, की विरोधकांना निवडणुकीत कधीही कमकुवत समजू नये. किशोर म्हणाले की, जो पक्ष दहा वर्ष सत्ते राहिल त्याच्याविरोधात सत्ताविरोधी लाट असणारच. मात्र, माझं काम हे समजून घेणं आहे, की लाट नेमकी कोणाविरोधात आहे. स्थानिक नेत्यांविरोधात, पक्षाविरोधात की मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरोधात. मात्र, या सगळ्याशिवाय बंगालमध्ये ममतांचाच विजय होणार, असा दावा त्यांनी केला.

Leave a Comment