रघुराम राजन स्वतःला पुढचे मनमोहन सिंग मानतात; भाजपची टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभाग नोंदवला होता. राजस्थान येथे त्यांनी राहुल गांधींसोबत पदयात्रेत सहभाग घेत आपला पाठिंबा दर्शवला. यावेळी त्यांनी राहुल गांधींसोबत चर्चाही केली. मात्र दुसरीकडे भाजपने मात्र रघुराम यजन यांच्यावर टीका केली आहे. रघुराम राज स्वत:ला पुढचे मनमोहन सिंग मानतात असं म्हणत भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालविया यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

काँग्रेस नियुक्त,आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन, यांचे राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सामील होणे आश्चर्यकारक नाही. रघुराम राज स्वत:ला पुढचे मनमोहन सिंग मानतात. भारताच्या अर्थव्यवस्थेसंदर्भात त्यांनी केलेलं भाष्य हे दुसऱ्याकडे तिरस्काराने बघण्याची पद्धत असं म्हणत झिडकारलं पाहिजे अशी टीका अमित मालवीया यांनी केली आहे.

दरम्यान, रघुराम राजन यांनी यापूर्वी अनेक वेळा केंद्रातील मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांवर टीका केलेली आहे. मोदी सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयावर सुद्धा त्यांनी उघडपणे निशाणा साधला होता. त्यातच त्यांनी आता राहुल गांधींसोबत भारत जोडो यात्रेत भाग घेतल्याने काँग्रेस सोबतची त्यांची जवळीक वाढलेली पाहायला मिळत आहे. काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर हॅन्डल वरून राघराम राजन यांचे राहुल गांधींसोबतचे फोटो शेअर केले होते. द्वेषाच्या विरोधात देशाला जोडण्यासाठी पाठिंबा देणाऱ्यांची संख्या वाढत आहे असं काँग्रेसने म्हंटल होत.