हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 71 वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने भाजपने जोरदार तयारी केली असून तब्बल 21 दिवस वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केलं आहे. या अभियानाला सेवा आणि समर्पणाचं नाव देण्यात आलं असून 7 ऑक्टोबर रोजी याची सांगता होणार आहे. भाजपनं यासाठी चार सदस्यीय समिती तयार केली आहे. ही समिती पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी उपक्रम आणि कार्यक्रमांचं आयोजन करणार आहे. दरम्यान, या समितीचं नेतृत्त्व कैलाश विजयवर्गीय करत आहेत
या २१ दिवसीय कार्यक्रमामध्ये १४ कोटी रेशनच्या पिशव्या, ५ कोटी थँक यू मोदीजी पोस्ट कार्ड, नदी स्वच्छता मोहिमेअंतर्गत ७१ जागांवर केलं जाणार काम, सोशल मीडियावरील कॅम्पेनसोबतच करोना लसीकरण आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवनावर आणि कार्याची माहिती देणाऱ्या सेमिनार्सचं आयोजन करण्यात येणार आहे.
पीएम गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत गरीबांना १४ कोटी रेशनच्या पिशव्यांचं वाटप करण्यात येणार. हा कार्यक्रम मोठ्या स्तरावर आयोजित करण्यात येणार असून यामध्ये पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी वितरण केंद्रावर जाऊन सहभागी होतील.
दरम्यान, नदी स्वच्छता मोहिमेअंतर्गत विशेष कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. देशभरातील ७१ ठिकाणी नद्या स्वच्छ केल्या जाणार आहेत.
अनाथ मुलांसाठी भाजपाकडून एक विशेष मोहिम राबवली जाणार आहे. पंडित दीनदयाल उपाध्याय आणि महात्मा गांधींच्या जंयतीनिमित्ती विशे, कार्यक्रम आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आलेत.
देशातील वेगवेगळ्या बागांमधून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानणारी पाच कोटी शुभेच्छापत्र पाठवली जाणार.