आमदारांच्या खरेदीसाठी भाजप पैशाचा वापर करत आहे : राहुल गांधी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अहमदाबाद |  कर्नाटकात सुरु असलेल्या सत्ता संघर्षावर राहुल गांधी यांनी आज प्रथमच भाष्य केले आहे. आमदारांच्या खरेदीसाठी भाजप आमदारांना पैसे देते आहे. सत्ता स्थापनेसाठी धनशक्तीचा वापर करण्याची हि काय पहिलीच वेळ आहे असे नाही. याआधी देखील भाजपने असे प्रयत्न केले आहेत असे राहुल गांधी म्हणाले आहेत.

भाजपचे सत्ता हस्तगत करण्याचे राजकारण सुरु आहे असे म्हणत राहुल गांधी यांनी भाजपच्या राजकारणावर चांगलीच टीका केली आहे. भाजप सत्ता स्थापनेसाठी धनशक्तीचा वापर करत आहे. याआधी देखील भाजपने पूर्वोत्तर भारतात सत्ता स्थापनेसाठी अशाच प्रकारे धनशक्तीचा प्रयोग केला होता याची आठवण राहुल गांधी यांनी करून दिली आहे.

अहमदाबाद येथे राहुल गांधी यांच्यावर मानहानीचा दावा ठोकण्यात आला आहे. त्या दाव्याच्या सुनावणीसाठी आज राहुल गांधी अहमदाबादमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधून कर्नाटकाच्या राजकारणावर भाष्य केले आहे. दरम्यान आज सर्वोच्च न्यायालयात बंडखोर आमदारांच्या राजीनाम्या प्रकरणी सुनावणी घेण्यात आली. त्यात मंगळवार पर्यंत राजीनाम्यावर विधानसभा अध्यक्षांनी कोणताच निर्णय घेऊ नये असे सुनावण्यात आले आहे. त्यामुळे किमान मंगळवार पर्यंत तरी कर्नाटकमधील सत्ता संघर्ष कायम राहणार आहे.

Leave a Comment