मुंबई | आगामी लोकसभा निवडणूक पंतप्रधान नरेंन्द्र मोदी यांच्याच नेतृत्वाखाली लढणार असल्याची घोषणा भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी बुधवारी केली. मुंबई येथे रिपब्लिकन टीव्हीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
‘एनडीए २०१९ ची लोकसभा निवडणुक पंतप्रधान मोदीजींच्याच नेतृत्वाखाली लढवेल’ असा विश्वास शहा यांनी यावेळी व्यक्त केला. ‘भाजपाच्या नेतृत्व बदलाचा प्रश्नच उद्भवत नाही’ असं म्हणत शहा यांनी मोदींच्या नेतृत्व बदलाच्या चर्चेला पूर्णविराम दिला. ‘२०१४ मध्ये भाजपकडे सहा राज्यांमध्ये सरकार होती, आता आमच्याकडे १६ राज्ये आहेत. आता तुम्हीच मला सांगा कोण आगामी लोकसभा कोण जिंकेल?’ असे प्रतिउत्तर शहा यांनी रिपब्लिक टीव्हीचे प्रमुख अर्नब गोस्वामी यांनी विचारलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात दिले.
महाराष्ट्रातील शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) चे प्रमुख मोहन भागवत आणि सरचिटणीस भैयाजी सुरेश जोशी यांना पत्र लिहून नितिन गडकरी यांना पुढले पंतप्रधानपद देण्याची विनंती केली असतांना शहा यांनी केलेल्या विधानाला महत्व प्राप्त झाले आहे.
इतर महत्वाचे –
म्हणून मी पेरु समाधीवर ठेवला आणि दर्शन घेतले – पंकजा मुंडे
भाजपाची हार हे तर भारतात लोकशाही मजबुत असल्याचं उदाहरण – सुमित्रा महाजन
इंडिया टू पाकिस्तान वाया अफगानिस्तान, हामिद अंसारीची फिल्मी लव्हस्टोरी
दिवसभराच्या ताज्या घडामोडी आणि असे हटके व विशेष लेख घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.