भाजप आता सत्तास्थापन करणार; केंद्रीय मंत्र्यांचे मोठं विधान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरी मुळे राज्यात राजकीय भूकंप घडला असून महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले आहे. मात्र इतकं मोठी घडामोड होऊनही भाजपने अधिकृत पणे कोणतीही भूमिका अद्याप स्पष्ट केली नव्हती . पण भाजप आता सत्तास्थापन करणार असा दावा केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी केला.

महाविकास आघाडीवर आलेलं संकट हे त्यांच्या वागण्यामुळे झालं आहे. त्यांच्यातील आमदारांचाच एकमेकांवर विश्वास नाही. पक्षांचा एकमेकांवर विश्वास नव्हता. अशा प्रसंगी आमदारांची कामे झाली नाही, आमदारांना मुख्यमंत्री भेटत नव्हते हा त्यांचा आरोप होता. यामागे भाजपचा हात नाही मात्र आता भाजप सत्तास्थापन करेल आणि जनतेला न्याय मिळेल अस भागवत कराड म्हणाले.

दरम्यान, दुसरीकडे महाविकास आघाडी सरकार वाचवण्यासाठी शरद पवार स्वतः मैदानात उतरले आहेत. शिवसेनेतील बंड पवार स्वतः हाताळणार आहेत. त्यामुळे राज्यात अनेक राजकीय घडामोडी पाहायला मिळू शकतात.