कोल्हापूर । राज्यातील 3 पदवीधर, 2 शिक्षक मतदारसंघ आणि धुळे-नंदुरबार विधान परिषदेच्या जागेसाठी मतदान पार पडत आहे. या 6 जागाही आम्हीच जिंकणार असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. या जागांवर चुरस आहे पण विजयाची खात्री असल्याचा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. इतकच नाही तर पुण्याची जागा एका हाती जिंकणार पाटील यांनी म्हटलं.
पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या मतदानासाठी चंद्रकांत पाटील कोल्हापुरात आले होते. त्यावेळी त्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. ‘पुणे पदवीधर मतदारसंघात आपण दोन वेळा आमदार झालो आहोत. तेव्हा उमेदवार स्ट्रॉंग होते. आता तर उमेदवार विक आहे. अरुण लाड यांना घरचा रस्ता दाखवण्याचाच हा मार्ग आहे’, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.
पदवीधरचा आमदार असताना आपण केलेल्या कामाची यादी मोठी असल्याचा दावाही चंद्रकांत पाटील यांनी केलाय. विरोधकांना मुद्दाच नाही. झोपलेल्याला उठवता येतं पण झोपेचं सोंग घेणाऱ्याला उठवता येत नसल्याची टीका पाटील यांनी महाविकास आघाडीवर केलीय. पुणे पदवीधर हा 36 वर्षे आमचा गड राहिला आहे. आताही तो कामय राहिल असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला. (BJP will win 6 seats in the Legislative Council, claims Chandrakant Patil)
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी मतदान केंद्र सज्ज, निकाल 3 डिसेंबरला
वाचा सविस्तर- https://t.co/fNJztEd8Pf#HelloMaharashtra #पदवीधर #निवडणूक #ElectionDay2020— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) December 1, 2020
मुंबईतून बॉलिवूड कोणीही नेऊ शकत नाही; पण योगी पर्याय देत असतील तर गैर काय?- चंद्रकांत पाटिल
वाचा सविस्तर-👉🏽 https://t.co/0BcjHglE1J@ChDadaPatil @BJP4Maharashtra @NCPspeaks #YogiAdityanath #Bollywood #HelloMaharashtra— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) December 1, 2020
आंदोलक शेतकरी आणि सरकारमध्ये आज चर्चा, कृषी कायद्यावर तोडगा निघणार का?
वाचा सविस्तर-👉🏽 https://t.co/zzBe5fxABd#Farmers #FarmersProtestHijacked #FarmBills2020 #HelloMaharashtra @BJP4Maharashtra @AmitShah— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) December 1, 2020
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’