औरंंगाबाद | पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूकीच्या निकालानंतर पश्चिम बंगालमध्ये तृणमुल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर हिंसाचार सुरू केला असून भाजपच्या कार्यकर्त्यांना ठार मारण्यात येत आहे. या राजकिय हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बुधवारी (दि.५) उस्मानपुऱ्यातील भाजप कार्यालयासमोर निदर्शने, आंदोलन केले.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूकीच्या निकालानंतर पश्चिम बंगालमध्ये तृणमुल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर हिंसाचार सुरू केला आहे. या राजकिय हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते बुधवारी सकाळी भाजप कार्यालयासमोर जमले. त्यांनी ममता बनर्जी, तृणमूल कॉंग्रेस यांच्या विरोधात जोरदार नारेबाजी केली. तसेच लोकशाहीची गळचेप होत असल्याचाही आरोप केला.
भाजपा राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर, संघटनमंत्री भाऊराव देशमुख, माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ नाना बागडे, खासदार भागवत कराड, आमदार अतुल सावे, बापू घडामोडे, प्रविण घुगे, संघटन सरचिटणीस राजेश मेहता, शिवाजी दांडगे, प्रमोद राठोड, महिला मोर्चा प्रदेश सरचिटणीस सविता कुलकर्णी, अमृता पालोदकर, हाफिज शेख, आदी उपस्थित होते.