सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
सातारा येथे व्यापाऱ्यांना बंद न पाळण्याचे आवाहन भाजपाने केले होते. या आवाहनाला सातारा शहरातील काही व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिला. त्यामुळे सातारा शहरात आजचा महाविकास आघाडीचा बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे चित्र पहायला मिळाले.
साताऱ्यात राजवाडा आणि मंडई परिसरात काही व्यापाऱ्यांनी आणि शेतकऱ्यांनी दुकाने उघडी ठेवली आहेत तर एकाबाजूला सातारा शिवसेनेचे कार्यकर्ते दुकानदारांना, फळे विक्रेत्या हातगाडी चालकांना दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन करत असल्याचे चित्र साताऱ्यात पाहायला मिळत आहेत.. त्यामुळे या बंदला सातारकरांचा संमिश्र असा प्रतिसाद पहायला मिळत आहे.
काही व्यापाऱ्यांनी महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला साताऱ्यातील व्यापाऱ्यांनी विरोध करत दुकाने चालू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी लखीमपूरच्या घटनेचा व्यापाऱ्यांनी निषेध केला. मात्र दुकाने बंद न ठेवण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला आहे. आजच्या बंदला साताऱ्यात संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.
भाजप नगरसेवक धनंजय जांभळे म्हणाले, व्यापाऱ्यांच्या या निर्णयाचे भाजपने स्वागत केलं असून व्यापाऱ्यांनी बंद न पाळण्याचे सातारा भाजपने आवाहन केले आहे. शेतकरी चिरडल्या प्रकरणी महाविकास आघाडीने हा बंद पुकारला आहे. महामारीत व्यापारी बंद अवस्थेतच होता. महाविकास आघाडी सरकारने वेगळ्या पध्दतीने बंद पाळला जावू शकत होता. परंतु ही महाविकास आघाडी सरकार व्यापाऱ्यांना सणासुदीच्या दिवसात चिरडण्याचे काम करत आहे. तेव्हा हा बंद व्यापाऱ्यांनी पाळू नये.