औरंगाबाद : आरक्षणाच्या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने राज्यव्यापी चक्काजाम आंदोलनाची हाक देण्यात आली होती. त्याच अनुशनगणे आज आकाशवाणी चौकात शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी राज्यसरकार विरोधात घोषणाबाजी करीत रास्तारोको करीत आंदोलन केले.यावेळी पोलीसांनी अनेक आंदोलकांना ताब्यात घेतले.
भाजपने दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आज सकाळ पासूनच जालना रोडवरील आकाशवाणी चौकात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. 10 वाजता भाजपच्या आंदोलनाला सुरुवात झाली. आंदोलकांनी घोषणाबाजी करीत रस्त्यावरच ठिय्या देत चक्काजाम करण्याचा प्रयत्न केला. मोठ्या संख्येने आंदोलक रस्त्यावर उतरल्याने काहीकाळ वाहतूक विस्कळीत झाली होती. यावेळी पोलिस आणि आंदोलकामध्ये झटापट पाहायला मिळाली. पोलिसांनी रस्त्यावर ठिय्या देणाऱ्या आंदोलकांना ताब्यात घेतले.
आरक्षण आमच्या हक्कच ! आघाडी सरकार मुर्दाबाद, आरक्षण हम लेके राहेंगे अशा घोषणांनी आंदोलकांनी परिसर दणाणून सोडले होते. यावेळी खा. डॉ. भागवत कराड, आ. अतुल सावे, संजय केनेकर, माजी महापौर बापू घडामोड, नगरसेवक राजगौरव वानखेडे, संजय फत्तेलष्कर, सह शेकडो कार्यकर्ते आणि महिलांची मोठ्या संख्येने आंदोलनात उपस्थिती होती.
https://www.facebook.com/110982941057690/videos/1258222674593749