औरंगाबाद | औरंगाबाद तालुका पंचायत समितीच्या झालेल्या उपसभापती पदाच्या निवडणुकीत भाजपचे अर्जुन शेळके यांनी महा विकास आघाडीचे अनुराग शिंदे यांचा पराभव करून विजय संपादन केला. पंचायत समितीच्या उपसभापती मालतीबाई पडवळ यांनी राजीनामा दिल्यामुळे गुरुवारी रिक्त पदासाठी निवडणूक घेण्यात आली होती.
औरंगाबाद पंचायत समितीमध्ये काँग्रेसचे आठ, भाजप सात, शिवसेना तीन, अपक्ष दोन असे राजकीय संख्याबळ आहे. काँग्रेस शिवसेना व पक्षांची आघाडी झाल्यामुळे औरंगाबाद पंचायत समितीवर काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व होते. त्यामुळे काँग्रेसच्या छायाताई घागरे या सभापती तर सेनेच्या मालतीबाई पडूळ या उपसभापती पदी विराजमान होत्या. परंतु उपसभापतीपदी मालतीबाई पडूळ यांना पदाचा राजीनामा दिल्यामुळे गुरुवारी निवडणूक घेण्यात आली.
यात काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन अर्जुन शेळके यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेसचे अनुराग शिंदे यांच्या विरोधात उभे राहात 10 मते घेऊन उपसभापती पद मिळवले. यात सभापती यांनी स्वतः शेळके यांना मतदान केल्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय औताडे यांनी सांगितले.