भाजपच्या ‘या’ खासदारास जीवे मारण्याचं धमकीचं पत्र

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उदयपूरमध्ये निर्दयी हत्येचा बळी ठरलेल्या कन्हैयालालच्या कुटुंबाला एक महिन्याचा पगार देण्याची घोषणा भाजपचे राज्यसभा खासदार किरोडीलाल मीना यांनी केली होती. त्यानंतर आता त्यांना धमकीचं पत्र पाठवण्यात आलेलं आहे.

मीना यांना पाठवण्यात आलेल्या पत्रामध्ये कन्हैयालालनंतर पुढचा नंबर तुमचा असेल, अशी धमकी देण्यात आहे. हे पत्र मिळाल्यानंतर खासदार मीना यांनी प्रतिक्रियाही दिली आहे. “कादिर अली नावाच्या जिहादीला माझी घोषणा आवडली नाही, त्यामुळे त्यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली आहे.”

“या कारवाईसाठी राजस्थानचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांना मी पत्र लिहिलं आहे. मी यापुढंही जनतेचा आवाज बुलंद करत राहणार आहे. जिहादी आणि त्यांना संरक्षण देणाऱ्या राजकीय शक्तींचा पर्दाफाश करत राहीन. त्यासाठी माझा जीव गेला तरी चालेल,” असे मीना यांनी म्हंटले आहे.